मुंबईत पाच दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप | पुढारी

मुंबईत पाच दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : सलग पाचव्या दिवशी गणेशाची मनोभावे सेवा केल्यानंतर  गणेश भक्तांनी रविवारी दुपारनंतर बाप्पाला निरोप देण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत १६६ घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यात आले. दीड दिवसाच्या बाप्पाला गुरुवारी निरोप दिला होता. शहर व उपनगरांतील सार्वजनिक व घरगुती असे एकूण १६६ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास सर्वांनी पसंती दिली.

बाप्पाचे ढोलताशांच्या गजरात विर्सजन करण्यात येत आहे. विसर्जनस्थळी भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी पालिकेने नियोजनबद्द व्यवस्था केली आहे. पालिकेने विभागवार तयार केलेल्या कृत्रिम तलावात भाविकांनी गणेशमूर्तींचे विसर्जन केले. समुद्र, खाडीच्या ठिकाणी जीवरक्षक, मोटार बोट, नियंत्रण कक्ष, मोबाईल टॉयलेट, निरीक्षण मनोरे, वैद्यकीय मदत, विद्युत व्यवस्था, रुग्णवाहिका, काही ठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्रे आदी सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

उंच गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी क्रेनची व्यवस्थाही करण्यात आली आहे. घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ्या गणपतीचे चौपाटी आणि तलाव येथे विसर्जन करण्यासाठी व्यवस्था केली आहे. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button