हा ‘राहुल रिलाँचिंग’चा पाचवा सीझन, भाजपने उडवली राहुल गांधींची खिल्ली | पुढारी

हा 'राहुल रिलाँचिंग'चा पाचवा सीझन, भाजपने उडवली राहुल गांधींची खिल्ली

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा – भारतीय जनता पक्षाने रविवारी काँग्रेसच्या ‘हल्ला बोल’ रॅलीवर राहुल गांधी यांची खिल्ली उडवत काँग्रेसवर हल्ला चढवला. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित करताना सांगितले की, नासाचे शास्त्रज्ञ देखील अयशस्वी रॉकेटच्या वारंवार प्रक्षेपणामुळे आश्चर्यचकित झाले आहेत. ते काँग्रेसशी संपर्क साधून विचारत आहेत की पक्ष कसा सांभाळत आहे.

Mehangai Par Halla Bol: रामलीला मैदानावर आज ‘महागाईवर हल्ला बोल’ रॅली

पूनावाला म्हणाले की हल्ला बोल रॅली हा ‘राहुल रिलाँचिंग’चा पाचवा सीझन आहे. यापूर्वीचे चार सीझन फ्लॉप झाले आहेत. पूनावाला एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी ममता बॅनर्जी, केसीआर, अरविंद केजरीवाल आणि नितीश कुमार यांच्यावरही हल्लाबोल केला. ‘मैं हूं ना’ या चित्रपटाच्या धर्तीवर हे सर्व नेते काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

हल्लाबोल रॅलीत जयराम रमेश यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले की, आज जनतेसमोर सर्वात मोठी समस्या महागाई आणि बेरोजगारी आहे. या रॅलीद्वारे असंवेदनशील मोदींना सरकारला संदेश द्यायचा आहे की जनता महागाई आणि बेरोजगारीने त्रस्त आहे, त्यावर तोडगा काढला पाहिजे.

हे ही वाचा :

Rahul Gandhi : राहुल गांधींनी सुरू केली ‘२०२४’ ची तयारी; देशभरात काढणार ‘भारत जोडो यात्रा’

राहुल गांधी यांच्यामुळे काॅंग्रेसची सल्लागार यंत्रणा उद्ध्वस्त; गुलाम नबी आझादांचा आरोप

Back to top button