मुंबई : नवघरला धावत्या रिक्षेत विद्यार्थिनीचा विनयभंग | पुढारी

मुंबई : नवघरला धावत्या रिक्षेत विद्यार्थिनीचा विनयभंग

मीरा रोड; पुढारी वृत्तसेवा :  खासगी शिकवणीसाठी रिक्षाने जाणार्‍या विद्यार्थिनीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला आणि घाबरलेल्या विद्यार्थिनीने धावत्या रिक्षातून उडी मारल्याने तिच्या गुडघ्याला दुखापत झाली. नवघर पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे.

नवघर पोलीस ठाणे हद्दीत स्वातंत्र्यदिनी सायंकाळच्या सुमारास विद्यार्थिनी क्लासला जाण्यासाठी रिक्षा पकडली होती. त्यानंतर त्या रिक्षा चालकाने तिला क्लासेसचे नाव विचारले त्यानंतर त्या पीडितेस रिक्षा चालक बोलू लागला की क्लासेसमध्ये तर मजा करत असशील आज आपण मजा करू म्हणून रिक्षा सरळ मार्गाने घेऊन न जाता आडमार्गाने घेऊन जात होता. त्यावेळी पीडितेने विचारले की रिक्षा इकडे कुठे घेऊन जाताय त्यावर हा शॉर्टकट आहे. त्यावेळी मुलीने घाबरून चालत्या रिक्षातून उडी मारली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासून रिक्षा चालक कृष्णकांत मौर्या (46 ) यास अटक केली.

Back to top button