आमदार भरत गोगावले यांच्‍या गाडीला अपघात | पुढारी

आमदार भरत गोगावले यांच्‍या गाडीला अपघात

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या कारचा अपघात झाला. मुंबई ईस्टर्न फ्री वे वर आज (दि.११) सकाळी हा अपघात झाला.

एका पाठोपाठ एक अशा सात गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु आमदार गोगावले यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. आमदार निवासातून मंत्रालयाच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button