पर्यटकांना खुणावताेय साताऱ्यातील प्रसिद्ध ठोसेघर धबधबा...(व्हिडिओ) | पुढारी

पर्यटकांना खुणावताेय साताऱ्यातील प्रसिद्ध ठोसेघर धबधबा...(व्हिडिओ)

सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातारा शहरापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर असलेला ठोसेघर धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू पाहतोय. निसर्गरम्य परिसरात पर्यटकांना स्वच्छंदीपणे मनमोकळ्या वातावरणात निसर्गाशी गुजगोष्टी करण्याचे ठिकाण म्हणजेच “ठोसेघरचा धबधबा”…

या ठिकाणी 2 धबधबे असून एक लहान धबधबा 110 मीटर उंचीवरून कोसळतो तर दुसरा साधारण 350 मीटर उंचावरून कोसळतो..
दऱ्या कपारीतून वाट काढत तब्बल अकराशे फूट खोल दरीत हा ठोसेघरचा धबधबा कोसळत आहे. या धबधब्याकडे येणारा पर्यटक फक्त महाराष्ट्रच नाही तर परदेशी पाहुण्यांनाही आपलेसे केले आहे. अनेक परदेशी पाहुणे दरवर्षी भेट देत असतात.

निसर्ग हिरव्या रंगाने नटला

सातारा जिल्ह्याला निसर्गाची देणगी लाभली आहे.साता-याचा प्रसिद्ध ठोसेघर धबधबा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात फेसाळला असून डोंगर दऱ्यांना पालवी आणि पाझर फुटू लागल्याने निसर्ग हिरव्या रंगाने नटला आहे. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, साताऱ्याचे निसर्ग पर्यटन बहरते. येथे येणाऱ्या पर्यटकांमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत असतो. सातारा जिल्ह्याला निसर्गाची देणगी लाभली आहे. कोरोनामुळे दाेन वर्ष बंद असलेली सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे खुली झाल्‍याने पावसाबरोबर पर्यटनस्थळे पर्यटकांनी ओसंडून वाहत आहेत. येथे येणारा पर्यटक निसर्गाच्या प्रेमात पडल्याखेरीज राहणार नाही, हे मात्र नक्की.

पहा व्हिडिओ : साताऱ्यातील प्रसिद्ध ठोसेघर धबधबा

हेही वाचा

Back to top button