पवार, फडणवीस यांच्या नवी दिल्लीत हालचाली | पुढारी

पवार, फडणवीस यांच्या नवी दिल्लीत हालचाली

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा :  मागील काही दिवसांत तीनवेळा गुप्तपणे दिल्ली दौरा करून झालेले भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौर्‍यावर येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार आणि फडणवीस यांच्या दिल्ली दौर्‍यात कोणत्या घडामोडी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रपती निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी साडेअकराला यशवंत सिन्हा हे संसद भवनात आपला अर्ज भरणार आहेत. यावेळी शरद पवार उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीचे सरकार वाचविण्यासाठी पवार यांचे आटोकाट प्रयत्न चालू आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौर्‍याची चर्चा सुरू आहे. भाजपने आपल्या मोहिमा अत्यंत गुप्त ठेवल्या असून फडणवीस हे दिल्ली दौर्‍यात भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी खलबते करणार असल्याचे समजते. भाजपविरोधी आघाडीचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण दिल्लीला आलो आहोत, असे पवार यांनी दिल्ली विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Back to top button