मुंबई विद्यापीठात अधिसभा निवडणुकीचे वारे | पुढारी

मुंबई विद्यापीठात अधिसभा निवडणुकीचे वारे

मुंबई :  पुढारी वृत्तसेवा :  मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचा कार्यकाळ संपत असल्याने विद्यापीठ प्रशासनाने अधिसभा सदस्य निवडणूक त्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू करण्याबाबत बुधवारी अधिसूचना काढली आहे. याबरोबरच 1 सप्टेंबरपासून ही नवीन अधिसभा अमलात येणार आहे. मुंबई विद्यापीठाने निवडणूक प्रक्रिया सुरू केली असून यासाठी www.mu.ac.in या वेबसाइटवर ‘निवडणूक 2022’ हा स्वतंत्र टॅब तयार केला आहे.

याद्वारे मुंबई विद्यापीठाशी संलग्ल कॉलेजे, संस्था यांचे व्यवस्थापन प्रतिनिधी, प्राचार्य, विभाग प्रमुख, अध्यापक, विद्यापीठ अध्यापक आणि नोंदणीकृत पदवीधर यांना वेळोवेळी सूचना देण्यात येतील असे प्र. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी काढलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच या प्रक्रियेबाबत कोणाला शंका किंवा अडचणी असतील त्यांनी निवडणूक विभागास कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button