बैठकीला उपस्थित रहा, नाहीतर कारवाईला सामोरे जा; शिवसेनेचा बंडखोर आमदारांना निर्वाणीचा इशारा | पुढारी

बैठकीला उपस्थित रहा, नाहीतर कारवाईला सामोरे जा; शिवसेनेचा बंडखोर आमदारांना निर्वाणीचा इशारा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने विधीमंडळ पक्षाची बैठक आज (बुधवार) संध्याकाळी ५ वाजता वर्षा बंगल्यावर बोलवली आहे. या बैठकीला हजर राहण्याबाबत शिवसेना मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी पत्र जारी केले आहे. या बैठकीला आपण उपस्थित न राहिल्यास आपण स्वेच्छेने शिवसेना पक्षाचे सदस्यत्व सोडण्याचा तुमचा स्पष्ट इरादा आहे, असे मानले जाईल आणि परिणामी आपणावर भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रतेच्या संदर्भात असलेल्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा या पत्राद्वारे देण्यात आला आहे.

या बैठकीबाबतचे पत्र आमदारांच्या ई मेलवर, समाज माध्यमाद्वारे, व्हाट्सअपवर पाठविण्यात आले आहे. या बैठकीला लिखित स्वरूपात आणि वैध आणि पुरेशी कारणे असल्याशिवाय गैरहजर राहता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 

हे ही वाचलंत का?

Back to top button