काँग्रेसचा ठाकरे सरकारला पूर्ण पाठिंबा : कमलनाथ | पुढारी

काँग्रेसचा ठाकरे सरकारला पूर्ण पाठिंबा : कमलनाथ

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बंडखोर आमदार भ्रष्ट करणार नाहीत. काँग्रेसचा ठाकरे सरकारला पूर्ण पाठिंबा असुन काँग्रेस महाविकास आघाडीसोबतच राहणार असल्याचे काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी स्पष्ट केले आहे. शरद पवारांशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेत नाराज असलेले नेते एकनाथ शिंदे यांनी विधान परिषद निवडणुकीनंतर बंड केले. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. त्यांच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांची गोळाबेरीज केली आहे. शिवसेनेत माजलेल्या बंडाळीमुळे मुख्यमंत्री ठाकरे सरकार बरखास्तीची शिफारसही करू शकतात. या पाश्वभूमीवर कमलनाथ यांनी काँग्रेस महाविकास आघाडीसोबतच असल्याचे सांगितले आहे. तसेच छत्रपतींच्या महाराष्ट्राला बंडखोर आमदार भ्रष्ट करणार नाहीत असेही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button