राष्ट्रपती निवडणूक : विरोधकांच्या बैठकीला शिवसेनेचे सुभाष देसाई राहणार उपस्थित | पुढारी

राष्ट्रपती निवडणूक : विरोधकांच्या बैठकीला शिवसेनेचे सुभाष देसाई राहणार उपस्थित

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रपती निवडणुकीच्या उमेदवार निवडीला वेग आला आहे. यासंदर्भात तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आज दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिवसेनेच्या वतीने उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित राहणार आहेत. कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये दुपारी ३ वाजता बैठक होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी दिल्लीत दाखल झाल्यानंतर, त्यांच्या निवासस्थानी मंगळवारी दिवसभर राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनीही पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. बॅनर्जी यांनी आज विरोधी पक्ष नेत्यांची दिल्ली येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीला काँग्रेसच्या वतीने राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश आणि रणदीप सुरजेवाला उपस्थित राहणार आहेत. शिवसेनाही या बैठकीत सहभागी होत आहे. शिवसेनेच्यावतीने उद्योगमंत्री देसाई उपस्थित राहणार असुन ते नवी दिल्लीला रवाना झाले आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button