परभणी : एरंडेश्वर परिसरात चक्रीवादळाने हाहाकार | पुढारी

परभणी : एरंडेश्वर परिसरात चक्रीवादळाने हाहाकार

पूर्णा; आनंद ढोणे : एरंडेश्वर गाव परिसरात बुधवारी (दि.१८) रात्री ८:३० ते ९ वाजताच्या सुमारास चक्रीवादळासह जोरदार पाऊस पडला. चक्रीवादळाने अक्षरशः हाहाकार उडाला. शेतातील अखाड्यावरील पत्रे, रानातील चारा, कडबा भिजल्याने मोठे नुकसान झाले.

सलग दोन दिवस झालेल्या चक्रीवादळात विद्यूतखांब कोसळले आहेत. अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्या आहेत. काही ठिकाणी शेतशिवारातील रोहीत्र भुईसपाट झाली. मोठमोठी झाडे उन्मळून पडली. झाडे घरावर कोसळ्याने घरांचे मोठे नुकसान झाले आहे. येथील शेतकरी सुदाम शंकरराव काळे यांचा बोअरवेलच्या कृषीपंपासाठी बसवलेला सोलार पॅनल संच मोडून १ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.

एरंडेश्वर शिवारात चक्रीवादळामुळे विद्युतखांब, विजेच्या तारा तुटून पडल्या आहेत. महावितरणचे अभियंते, कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीची कामे सुरू केली नसल्याने विद्यूत पुरवठा बंद आहे. परिणामी कृषीपंप बंद असल्याने पिण्याचे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या पाच-सहा दिवसापासून पूर्णा तालुक्यात वादळीवा-यासह अवकाळी पाऊस पडत आहे. अवकाळीने झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Back to top button