परभणी : मराठवाडा एक्सप्रेसला म्हैशीने अडविले; प्रवाशांची तारांबळ | पुढारी

परभणी : मराठवाडा एक्सप्रेसला म्हैशीने अडविले; प्रवाशांची तारांबळ

पूर्णा; पुढारी वृत्तसेवा : नांदेड रेल्वे स्टेशन येथून मनमाडकडे जाणाऱ्या मराठवाडा (हायकोर्ट) एक्सप्रेसपुढे अचानक म्हैस आडवी आली. यामुळे पूर्णा नदीवरील रेल्वे ब्रिजजवळ अर्धा तास रेल्वे थांबवावी लागली. हा प्रकार आज (दि.१२) सकाळी ७.४७ च्या दरम्यान घडला. यामुळे प्रवाशांची चांगलीच ताराबंळ उडाली.

रेल्वेमार्गावरून ही म्हैस बाजूला करण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली. अर्ध्या तासानंतर ही म्हैस रेल्वेमार्गावरून बाहेर काढण्यात आली. त्यानंतर एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ८.४५ ला ही एक्सप्रेस परभणी रेल्वे स्थानकात पोहचली.

मेगाब्लॉकच्या नावाखाली प्रवाशी गाड्यांची रुकावट

सध्या नांदेड-परळी, पूर्णा-अकोला, पूर्णा-नांदेड व अन्य ठिकाणी रेल्वे लोहमार्गावर विद्यूत वाहिन्यांवर गाड्या सुरू करण्यात येत आहेत. यासाठी विद्युत खांब रोवणी, विद्यूततारा जोडणी करणे, असे काम सुरू आहे. प्रवासी गाड्यांना कोणतीही पुर्वसुचना न देता मेगाब्लॉकच्या नावाखाली या गाड्या लोकल स्थानकांवर तासंतास थांबवण्यात येतात. याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो.

हेही वाचा :

Back to top button