मोसंबी विमा भरण्यास दोन दिवसाची मुदतवाढ द्या, स्वाभिमानीची मागणी | पुढारी

मोसंबी विमा भरण्यास दोन दिवसाची मुदतवाढ द्या, स्वाभिमानीची मागणी

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा मागील दोन दिवसापासून बंद होती. त्यामुळे या भागातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना मोसंबी फळपिक विमा भरण्यासाठी इंटरनेट बंद असल्यामुळे विमा भरता आला नाही. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळपीक विमा भरण्यासाठी शासनाने दोन दिवसाची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात नमूद करण्यात आले की,३१ ऑक्टोबर ही मोसंबी फळ पिक विमा भरण्याची अंतिम तारीख होती. या दिवशी इंटरनेट सेवा बंद असल्याकारणाने जालना जिल्ह्यासह , छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळ पिक विमा भरता आला नाही. यावर्षी अल्फा पाऊस असल्याने दुष्काळी परिस्थितीत आपल्या फळबागांना विमा संरक्षण मिळावे म्हणून या जिल्ह्यात फळ पिक विमा भरण्यासाठी शासनाने मुदत वाढ द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

मराठवाडा हे मोसंबीचे आगार म्हणून ओळखले जाते. येथे हजारो हेक्टरवर मोसंबी फळबागा आहेत.या फळबाग धारक शेतकऱ्यांना मोसंबी फळपीक विमा भरण्यासाठी शासनाने मुदत वाढ द्यावी अशी मागणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी केली आहे.

Back to top button