जालना: जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला ग्रामस्थांचा विरोध; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना निवेदन देताना अंतरवाली सराटी येथील ग्रामस्थ
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना निवेदन देताना अंतरवाली सराटी येथील ग्रामस्थ
Published on
Updated on

जालना, पुढारी वृत्तसेवा: अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात मराठी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील मंगळवार (दि.४) पासून उपोषणास बसणार आहेत. या उपोषणाला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी डॉ. कृष्णा पांचाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे सोमवारी (दि.३) केली.

जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे २९ ऑगस्ट २०२३ पासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी विविध प्रकारचे आंदोलने केली आहेत. या आंदोलनाला गावातील सर्वच जाती-धर्मातील लोकांनी पाठिंबा दिला होता. या आंदोलनामुळे गावामध्ये अनेक नेत्यांचा वावर वाढला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून लोक आले होते. या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबाही मिळत होता. परंतु, आता या आंदोलनाचा विषय भरकटत चालला आहे. त्यामुळे गावामध्ये जातीभेद, आपापसात द्वेष, भीतीचे वातावरण, एक दुसर्‍यांचा तिटकारा सुरू झाला आहे.

एवढेच नव्हे तर मंदिराच्या बाजूलाच हे आंदोलन सुरू असल्यामुळे महिला वर्ग देखील या मंदिरात येण्यास धजावत नाही. त्यामुळे या आंदोलनाला आता पुढील परवानगी देऊ नये, अशी मागणी गावकर्‍यांनी केली आहे. या निवेदनावर ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news