मनोज जरांगे-पाटील यांचे मंगळवारपासून सुरू होणारे आमरण उपोषण स्थगित

file photo
file photo
Published on
Updated on

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील मंगळवारपासून (दि.४) अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू करणार होते. परंतु, लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा जरांगे यांनी आज (दि.३) सायंकाळी केली.

गृहमंत्रालयाकडून आंदोलन रोखण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. निकालादिवशी आंदोलन करू नये, यासाठी दबाव आणला जात आहे. दरम्यान, आमरण उपोषण ८ जूनपर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

जरांगे-पाटील यांचे आमरण उपोषण स्थगित का?

  • निकालादिवशी आंदोलन करू नये, यासाठी दबाव
  • अंतरवाली सराटी ग्रामस्थांचा आंदोलनाला विरोध,  जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
  • आमरण उपोषण ८ जूनपर्यंत स्थगित

मराठा आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही : जरांगे-पाटील

सरकारने काढलेल्या सगे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी. मराठा व कुणबी एकच आहे, असा अध्यादेश काढावा, या प्रमुख मागण्यांसाठी जरांगे पाटील आमरण उपोषण करणार होते. यासाठी अंतरवाली येथे तयारी पूर्ण झालेली आहे. या ठिकाणी १०० बाय १०० चा भव्य पत्रा शेडचा मंडप उभारण्यात आलेला आहे. पावसापासून या आंदोलनाला बाधा येऊ नये, म्हणून टिन पत्रे टाकण्यात आलेले आहेत. सरकारने आतापर्यंत समाजाची फसवणूक केलेली आहे. आंदोलन मोडीत काढण्यासाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत. मात्र, हे आंदोलन मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नसल्याचा ठाम निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

अंतरवाली सराटी ग्रामस्थांचा आंदोलनाला विरोध,  जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात मराठी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील मंगळवार (दि.४) पासून उपोषणास बसणार आहेत. या उपोषणाला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी डॉ. कृष्णा पांचाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे सोमवारी (दि.३) केली. मंदिराच्या बाजूलाच हे आंदोलन सुरू असल्यामुळे महिला वर्ग देखील या मंदिरात येण्यास धजावत नाही. त्यामुळे या आंदोलनाला आता पुढील परवानगी देऊ नये, अशी मागणी गावकर्‍यांनी केली आहे. या निवेदनावर ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

पहिले उपोषण

29 ऑगस्ट- जरांगे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले

1 सप्टेंबर – जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी दगडफेक आणि लाठीमार

14 सप्टेंबर –  जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्याच्या हस्ते पहिलं उपोषण सोडलं.

14 सप्टेंबर – शिंदेंना सरसकट मराठ्यांना कुणबी आरक्षण देण्यासाठी 40 दिवसांची मुदत दिली.

दुसरे उपोषण

25 ऑक्टोबर – सरकारने आरक्षणाबाबत कोणतीही हालचाल न केल्यामुळं पुन्हा उपोषण

30 ऑक्टोबर – माजलगाव आणि बीडमध्ये हिंसाचार आणि जाळपोळ

02 नोव्हेंबर – जरांगेंचं दुसरं उपोषण मागे, न्यायमूर्ती एम जे गायकवाड, सुनील शुक्रे, उदय सामंत , धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत उपोषण मागे,

2 जानेवारीची डेललाईन

तिसरे उपोषण

10 फेब्रुवारी – मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रासाठी. सगे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी उपोषण

20 फेब्रुवारी – विधान सभेचे विशेष अधिवेशन,  मराठ्यांना 10 टक्के आरक्षणाचं विधेयक विधानसभेत मंजूर

25 फेब्रुवारी – मुंबईतील सागर बंगल्यावर निघालेल्या जरांगेंना रोखलं.

26 फेब्रुवारी -17 व्या दिवशी महिलांच्या हस्ते सरबत पिवून उपोषण सोडले.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news