शेतकऱ्यांना मृग नक्षत्र पावसाची प्रतीक्षा | पुढारी

शेतकऱ्यांना मृग नक्षत्र पावसाची प्रतीक्षा

जवळाबाजार (हिंगोली) – पुढारी वृत्तसेवा : आगामी खरीप हंगामातील पेरणीस सुरुवात झाली आहे. शेतीची मशागत करून आता मृग नक्षत्र पावसाची प्रतीक्षा शेतकरी बांधव करत आहेत. शेतकरी बांधवांसमोर मागील वर्षाभरात प्रत्येक हंगामातील पिकांच्या उत्पादनातून शेतातील पेरणीचा खर्चसुद्धा निघालेला नाही. आता पुन्हा खरीप हंगामातील पेरणीस बियाणे आणि खत भाव वाढ संकट समोर निर्माण झाले आहे. खरीप हंगामातील पेरणीस बाजारपेठमध्ये सुधारित बियाणे आणि खत विक्रीस उपलब्ध झाले आहेत. खरीप हंगामातील पेरणीसाठी मृग नक्षत्र ७ जून रोजी लागणार आहे. एक महिन्याचा कालावधी शिल्लक असताना खरीप हंगामातील पेरणी मृग नक्षत्रात पाऊस पेरणीयोग्य झाल्यानंतर खरीप हंगामातील पेरणीस सुरूवात करण्यात येते. परिसरात बागायतदार क्षेत्रामध्ये कापसाची लागवड लवकर करण्यात येत असते.

जून महिन्यात खरीप हंगामातील पेरणीसाठी  शेतकरी बांधवांकडून खरीप हंगामातील पेरणी वेळेत होण्यासाठी शेतीची मशागत आणि बी-बियाणे, खत खरेदी शेतकरी बांधवांकडून करण्यात येते. खरीप हंगामातील उत्पादित मालावरच वर्षभरातील कुटुंबातील उदरनिर्वाह, शिक्षण आणि पुढील रब्बी हंगामातील पेरणीचा खर्च या सर्व बाबींवर खरीप हंगामातील उत्पादित मालावर अवलंबून राहणार आहेत. तरी खरीप हंगामातील पेरणीस शेतकरी बांधवास मुबलक बी-बियाणे आणि खतसाठा उपलब्ध करून देण्यात यावे, यासाठी कृषी विभागाकडून दखल घेण्यात यावी, अशी मागणी शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे.

Back to top button