हिंगोली : शिंदेवाडी येथे घराला आग; संसारोपयोगी साहित्य जळून खाक

हिंगोली : शिंदेवाडी येथे घराला आग; संसारोपयोगी साहित्य जळून खाक

औंढा नागनाथ: पुढारी वृत्तसेवा: शिंदेवाडी येथील शेतकरी गजानन दादाराव शिंदे यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून खते, बियाणे, संसारोपयोगी साहित्य, जनावरांचा चारा जळून खाक झाला. ही घटना आज (दि.१७) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. या आगीत सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

आगीची माहिती मिळताच शेतकरी संजय शिंदे, यादवराव शिंदे, रामराव शिंदे, विष्णू खटके, देविदास शिंदे, दुधीराम चव्हाण, रावसाहेब शिंदे, विष्णू जाधव, बाळू कुटे,नागनाथ मस्के यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, शेडमध्ये वाळलेला चारा असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. ग्रामस्थांनी औंढा नागनाथ येथील नगरपंचायतीच्या अग्निशमन दलास पाचारण केले.

या आगीत खत, बियाणे, गहू, ज्वारी यासह संसारोपयोगी साहित्य व जनावरांचा चारा जळून खाक झाला. शासनाने तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी गजानन शिंदे यांनी केली आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news