बीड: गेवराई येथील बुधवारी आठवडी बाजार बंद राहणार | पुढारी

बीड: गेवराई येथील बुधवारी आठवडी बाजार बंद राहणार

गेवराई, पुढारी वृत्तसेवा: राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तिसर्‍या टप्प्यातील उपोषण शनिवारपासून (दि.१०) सुरू केले आहे.आज उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे मराठा समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्रात बुधवारी (दि.१४) बंदची हाक देण्यात आली आहे.

त्यामुळे बीड जिल्हा कडकडीत बंद राहणार आहे. गेवराईत बुधवारचा आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. ग्रामीण भागातही मराठा समाजाच्या वतीने बंद पुकारण्यात आल्याचे सांगण्यात येते. ही बंदची हाक मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली आहे.

सराटी आंतरवलीत आज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. कुठलेही उपचार त्यांनी अद्याप घेतले नाहीत, त्यामुळे जरांगेंची प्रकृती पूर्णत: खालावली आहे. तसे व्हिडिओ सोशल मिडियाद्वारे बाहेर व्हायरल होत असल्याने जरांगेंच्या प्रकृतीवरून मराठ्यात संताप व्यक्त केला जात आहे. त्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बीड जिल्ह्यांसह मराठवाड्यातील सर्व ग्रामीण भागात बंदची हाक देण्यात आली आहे. गेवराई, येथील आठवडी बाजार बंद राहणार आहेत. दुसरीकडे पाटील पाणी तरी घ्या म्हणत मराठ्यांचा अंतरवलीत ठिय्या आजपासून सुरू झाला आहे.

हेही वाचा 

Back to top button