बीड : आंतरवाली सभेला गेलेल्या गेवराईच्या तरुणाचा उष्माघाताने मृत्यू ; जरांगे- पाटील यांच्याकडून श्रद्धांजली | पुढारी

बीड : आंतरवाली सभेला गेलेल्या गेवराईच्या तरुणाचा उष्माघाताने मृत्यू ; जरांगे- पाटील यांच्याकडून श्रद्धांजली

गेवराई, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे शनिवारी (दि. १४) मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची विराट जाहीर सभा संपन्न झाली. या सभेसाठी पायी गेलेल्या गेवराईतील एका तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच जरांगे- पाटील हे अंत्यविधीला उपस्थित राहून तरुणाला श्रद्धांजली अर्पण केली.

विलास शिवाजीराव पवार (वय ३५) असे मृताचे नाव आहे. मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे, यासाठी १४ ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटा येथे जाहीर सभा संपन्न झाली या सभेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झाले होते. दरम्यान या सभेसाठी गेवराई येथील विलास शिवाजीराव पवार हा तरुण शहागड येथून पायी गेला होता. याठिकाणी त्याला जास्त प्रमाणात उलटीचा त्रास सुरू झाल्यानंतर त्याने छोटा भाऊ गणेश याला कॉल करून माहिती दिली. यानंतर तातडीने त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वाहतूक कोंडीमुळे रुग्णालयात पोहोचायला उशीर झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि तीन मुली असा मोठा परिवार आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मनोज जरांगे पाटील यांनी अंत्यविधीला उपस्थित राहून त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत श्रद्धांजली अर्पण केली.

समाज तुमच्या पाठीशी कुटुंबाला उघड्यावर पडू देणार नाही

काल झालेल्या सभेदरम्यान उष्मघाताने गेवराई येथील तरुण विलास पवार यांच्या मृत्यूची बातमी रात्री उशिरा कळल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या अंत्यविधी बाबत माहिती घेऊन सकाळी 11 वाजता गेवराई येथील चिंतेश्वर स्मशानभूमीत अंत्यविधीला उपस्थित राहिले. यानंतर त्यांनी पवार यांच्या घरी जाऊन विलास पवार यांच्या पत्नी व तीन मुली व कुटुंबियांची विचारपूस केली. तो फक्त तुमचा मुलगाच नसून माझा भाऊ होता, असे समजून त्याला सर्वतोपरी मदत मिळवून देऊ, आपला समाज खूप मोठा आहे. या तीन मुलीचे शिक्षण व रक्षण ही समाजाची जबादारी असून आपला समाज तुमच्या कुटुंबियांना कधीच उघड्यावर पडू देणार नाही, असे सांगून विलास यांचा छोटा भाऊ, आई, पत्नी व तीन मुलींसह सर्व परिवाराचे सांत्वन केले.

हेही वाचा 

Back to top button