बीड : जरांगे-पाटलांच्या सभेहून परतत असताना दुचाकीला अपघात; एकाचा जागीच मृत्यू | पुढारी

बीड : जरांगे-पाटलांच्या सभेहून परतत असताना दुचाकीला अपघात; एकाचा जागीच मृत्यू

माजलगाव, पुढारी वृत्तसेवा : आंतरवाली सराटी येथील सभेहून गावी परतत असताना दुचाकीला अपघात झाला. या अपघातात एकजण जागीच ठार झाला. रामभाऊ ज्ञानेश्वर बागल (वय ४८, रा.सेलु जि.परभणी) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अंनतेश्वर ञिंबक मुकणे (रा.सेलु) हे जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, सेलु येथील रामभाऊ ज्ञानेश्वर बागल,अनंतेश्वर ञिंबक मुकणे हे दोघे जण शनिवारी सकाळी दुचाकीवरुन आंतरवाली सराटी येथे सभेसाठी गेले होते. सभेहून परत येत असताना गेवराई माजलगाव रस्त्यावरील लोणावळा फाट्याजवळ मोटरसायकलला कुञा आडवा आल्याने मोटरसायकल स्लिप झाली. या वेळी दुचाकीवर मागे बसलेले रामभाऊ ज्ञानेश्वर बागल हे रस्त्यावर जोरात आदळल्याने जागीच ठार झाले. तर मोटरसायकल चालक अनंतेश्वर ञिंबक मुकणे हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button