ज्ञानराधा मल्टीस्टेट प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे | पुढारी

ज्ञानराधा मल्टीस्टेट प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

पैठण, पुढारी वृत्तसेवा : ज्ञानराधा मल्टी स्टेट बँकेच्या माध्यमातून बीडसह पैठण तालुक्यातील खातेदारांची फसवणूक केली आहे. या फसवणुकीत तिरूमला उद्योग समूह आणि ज्ञानराधा मल्टीस्टेट शाखा पैठणचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे, अर्चना कुटे यांच्यावर कोटयावधी रुपयाचा गंडा घातल्याचा संशय आहे. यामध्ये 3 कोटी 69 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी पैठण येथे तक्रार दाखल केली होती. मात्र, आता या गुन्ह्याचा तपास छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, पैठण शहरातील ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेच्या शाखेतून ज्यादा व्याजदाराचे आमिष दाखवून खातेदारांकडून कोटयावधी रुपये मुदत ठेवीच्या नावाखाली फसवणूक केली होती. या प्रकरणी खातेदार मुकेश श्रीचंद पंजवाणी यांच्यासह फसवणूक झालेल्या पन्नासहुन अधिक खातेदारांनी पैठण पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.8) संबंधित ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी बँक शाखेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश ज्ञानोबा कुटे, पत्नी अर्चना कुटे आणि शाखा मॅनेजर पिवळ लोख, वैजनाथ डाके यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्याकडे दिला होता. मात्र, खातेदाराची आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणावर झाल्याने तसेच फसवणूक रक्कमेमध्ये मोठी वाढ होत असल्याने सदर प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांनी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रशांत शिंदे यांच्याकडे दिला आहे.

हेही वाचा :

Back to top button