chhatrapati sambhaji nagar: अजिंठा येथे दोन ट्रक एकमेकाला धडकले, रस्त्याव वाहतुक कोडी ! | पुढारी

chhatrapati sambhaji nagar: अजिंठा येथे दोन ट्रक एकमेकाला धडकले, रस्त्याव वाहतुक कोडी !

सिल्लोड; पुढारी वृतसेवा: जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गांवर अजिंठा येथील गोलटेक जवळ मंगळवारी (दि.१२) रात्री १०. ३० वाजेच्या सुमारास दोन ट्रक एकमेकाला धडकले. दोन्ही ट्रक रोडावर पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. दोन ट्रक भिडल्याने या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसून, दोन्ही ट्रकांचे मोठे नुकसान झाले आहे. (chhatrapati sambhaji nagar)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बेंगलोर येथून नारळ घेऊन आग्राकडे जाणारा ट्रक क्र. एम .पी . ०६ एच. सी.२४४० ला पाठी मागून येणाऱ्या सिल्लोड येथून कापूस गठाणी घेऊन आमदाबादला जाणारा ट्रक क्र.एम. एच. २० जी सी ९३९३ ने जोरधार धडक दिली.
त्यामुळे दोन्ही वाहने महामार्गावर पलटी झाली. नारळ व कापसाच्या गठानी रस्त्यावर पडल्याने रस्ता बंद झाला. परिणामी महामार्गावर वाहतुकीची चांगलीच कोंडी झाली. या घटनेची माहिती अजिंठा पोलिसांना मिळतात अजिंठा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर पडलेल्या दोन्ही ट्रक क्रेनच्या मदतीने रस्याच्या बाजुला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेची नोंद अजिंठा पोलीस ठाण्यात घेण्यात आली असून, या अपघाताचा पुढील तपास सपोनी अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी करीत आहे. (chhatrapati sambhaji nagar)

Back to top button