छ. संभाजीनगर: ‘बेटा मी आईला मारले’; हातोडीने डोक्यात घाव घालून पत्नीचा खून | पुढारी

छ. संभाजीनगर: 'बेटा मी आईला मारले'; हातोडीने डोक्यात घाव घालून पत्नीचा खून

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात खूनसत्र कायम असून दोन दिवसांपूर्वी छावणी ठाण्याच्या हद्दीत जुन्या वादातून पाच जणांनी तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना ताजी असताना मुकुंदवाडी हद्दीत पतीने पत्नीचा खून केल्याची घटना आज (दि.७) सकाळी घडली आहे. धक्कादायक म्हणजे एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या मुलाला फोन करून बेटा, मी आईला मारले, असेही संशयिताने आपल्या मुलाला सांगितले. तसेच त्याला व्हिडिओ कॉलही केला.

लीना कृष्णा नाफडे (वय 51, रा. म्हाडा कॉलनी, तोरणागडनगर, मुकुंदवाडी) असे मृत महिलेचे नाव असून कृष्णा नाफडे (वय ५३) असे संशयिताचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी कृष्णा नाफडे हा एका कंपनीत कामाला होता. ती कंपनी बंद पडल्यापासून तो मानसिक तणावात होता. त्याच्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. त्यामुळे तो अधिकच तणावात गेला होता. यातून पती-पत्नींमध्ये सतत वाद व्हायचे. यातूनच त्याने हातोडीने पत्नीच्या डोक्याचा चेंदामेंदा करून खून केला. पोलिसांना माहिती मिळाल्यावर मुकुंदवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button