Parbhani News : साखर कारखान्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकून ‘स्वाभिमानी’ने ऊस वाहतूक रोखली | पुढारी

Parbhani News : साखर कारखान्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकून 'स्वाभिमानी'ने ऊस वाहतूक रोखली

मानवत, पुढारी वृत्तसेवा : शेतातील ऊस नेण्यास टाळाटाळ करणाऱ्या जिल्ह्यातील दोन साखर कारखान्याच्या कार्यालयांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी आज (दि.८) सकाळी टाळे ठोकले. मानवत तालुक्यातील मंगरूळ पाटीवर असलेल्या विभागीय कार्यालयाला शेतकऱ्यांनी टाळे ठोकून ऊस वाहतूक रोखली. Parbhani News

सोनपेठ तालुक्यातील सायखेडा येथील ट्वेन्टी वन शुगर लिमिटेड व परभणी तालुक्यातील मौजे आमदापूर येथील लक्ष्मी नरसिंह शुगर्स या दोन कारखान्याला मानवत तालुक्यातील अनेक गावांतून ऊस तोडून नेला जात आहे. परंतु, अनेक शेतकऱ्यांची ऑक्टोबरमध्ये तोडीची नोंद व ५० हजारांचे शेअर्स अनामत कारखान्याकडे जमा आहे. तरीही ऊस तोडीस संबंधित कारखान्यांकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते. Parbhani News

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विठ्ठल चोखट यांच्या नेतृत्वाखाली आज संतप्त शेतकऱ्यांनी मंगरूळ पाटीवरून साखर कारखान्याकडे जाणारी ऊस वाहने रोखली. तसेच मंगरूळ पाटीवर असलेल्या कारखान्याच्या विभागीय कार्यालयास टाळे ठोकून आंदोलन सुरू केले. तब्बल दोन तासांनंतर या कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांशी चर्चा करून दोन दिवसांत ऊसतोड सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष दत्तराव परांडे, ज्ञानोबा चोखट, बाळासाहेब चोखट, गोविंद जाधव, दीपक चोखट, दशरथ सगरे, बाबासाहेब चोखट आदीसह शेतकरी सहभागी झाले होते.

हेही वाचा 

Back to top button