Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी राज्यात सकाळी ११ पर्यंत १७.५१ टक्के मतदान

Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी राज्यात सकाळी ११ पर्यंत १७.५१ टक्के मतदान

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) चौथ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजता पासून सुरू झाले आहे.  देशभरात ९६ जागांसाठी १७१७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाराष्ट्रासह १० राज्यात मतदान होत आहे. महाराष्ट्रात सकाळी ११ वाजेपर्यंत मतदान पाहता १७.५१  टक्के मतदान झाले आहे. (Lok Sabha Election 2024)

  • देशात सार्वत्रिक निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे.
  • सकाळी ११ वाजेपर्यंत  महाराष्ट्रात ६. ४५ टक्के मतदान झाले.
  • ११ वाजेपर्यंतची आकडेवारी पाहता राज्यात सर्वात जास्त मतदान नंदुरबार मतदारसंघात – ८.४३ टक्के तर सर्वात कमी मतदान शिरूर मतदार संघात- ४.९७ टक्के झाले.

लोकसभा निवडणूक महाराष्ट्रासह १० राज्यात मतदान होत आहे. महाराष्ट्रातील  नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या ११ लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. या मतदार संघात  महाराष्ट्रात सकाळी ११ वाजेपर्यंत मतदान पाहता १७.५१  टक्के मतदान झाले आहे.. मतदारसंघ निहाय सरासरी मतदान टक्केवारी पुढीलप्रमाणे.

चौथ्या टप्प्यातील ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी

  • जळगाव- १६.८९ टक्के
  • जालना – २१.३५ टक्के
  • नंदुरबार – २२.१२ टक्के
  • शिरूर- १४.५१ टक्के
  • अहमदनगर- १४.१४ टक्के
  • औरंगाबाद – १९.५३ टक्के
  • बीड – १६.६२ टक्के
  • मावळ -१४.८७ टक्के
  • पुणे – १६.१६ टक्के
  • रावेर – १९.०३ टक्के
  • शिर्डी -१८.८१ टक्के

जाणून  घ्या सर्वात जास्त कुठे  मतदान झाले? 

देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणुका पार पडत आहेत. चौथ्या टप्प्यात राज्यातील नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या ११ लोकसभा मतदार संघात मतदान होत आहे. या मतदारसंघातील सकाळी ११ पर्यंतची आकडेवारी पाहता सर्वात जास्त मतदान जालना  मतदार संघात २१.३५ टक्के तर सर्वात कमी मतदान अहमदनगर मतदार संघात १४.१४ टक्के झाले आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news