Beed Crime News: घरावर पेट्रोल टाकून सहा जणांना जाळण्याचा प्रयत्न; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल | पुढारी

Beed Crime News: घरावर पेट्रोल टाकून सहा जणांना जाळण्याचा प्रयत्न; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

केज, पुढारी वृत्तसेवा : घरात झोपलेले दोन चुलत भाऊ व त्यांच्या घरातील चार व्यक्ती असे ऐकून सहा जणांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. ही  घटना ढाकेफळ (ता. केज) येथे सोमवारी (दि.६) मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली. मात्र, लहान मुलांचे ओरडणे ऐकून लोक जमा होऊन आग विझवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. Beed Crime News

सख्खे चुलत भाऊ असलेले गोविंद दिलीप थोरात हे पत्नीसह व वैजेनाथ व्यंकटी थोरात हे पत्नी, दोन मुलांसह गावातील हनुमान मंदिरापाशी एकमेकांच्या शेजारीच पत्र्याच्या डब्यात राहतात. नेहमीप्रमाणे ते घरात झोपलेले असताना मध्यरात्री २.३० च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांना जीवे मारण्याच्या हेतुने त्यांच्या घरावर पेट्रोल टाकून आग लावली. Beed Crime News

पेट्रोलमुळे आगीचा भडका उडाला. त्यामुळे घरातील सर्वजण जागे झाले. आगीचे लोळ पाहून गोविंद व वैजनाथसह घरातील लहान मुलांनी आरडाओरड केला. यामुळे शेजारी लोक जागे झाल्यामुळे अनेकांनी पेटलेल्या घराकडे धाव घेतली. धनराज थोरात यांनी पत्रे फाडून लहान लेकरांना व सर्वांना बाहेर काढले. यामध्ये वैजनाथ थोरात यांच्या हात, पाय, डोक्याला भाजले. तसेच गोविंद थोरात व त्यांची पत्नी यांनाही आगीची झळ लागल्याने जखमा झाल्या आहेत. ही घटना जीवे मारण्याच्या हेतुने झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे युसुफवडगाव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय काळे हे करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button