बीडमधील जाळपोळप्रकरणी दोषींवर कारवाई होणार: धनंजय मुंडे

बीडमधील जाळपोळप्रकरणी दोषींवर कारवाई होणार: धनंजय मुंडे
Published on
Updated on

माजलगाव: पुढारी वृत्तसेवा: आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन पाहणी केली. जाळपोळ, तोडफोडप्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर निश्चितच कारवाई होणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे मुंडे यांनी यावेळी सांगितले.

आमदार सोळंके यांच्या निवासस्थानी आज (दि. ५) मंत्री मुंडे यांनी भेट दिली. तसेच पंचायत समिती, नगरपालिका याठिकाणी झालेल्या जाळपोळ व तोडफोडीची पाहणी केली.

मुंडे म्हणाले की, हल्ला प्रकरणातील दोषींवर निश्चित कारवाई होणार आहे. स्थानिक पोलीस व प्रशासनाने हल्ल्यावेळी जमावाला नियंत्रणात ठेवणे आवश्यक होते. नियंत्रण ठेवले असते, तर पुढील अनर्थ टळला असता.

यावेळी आमदार सोळंके म्हणाले की, हे राजकीय षड्यंत्र असून अवैध धंदेवाले व धान्याचा काळा बाजार करणारे हल्यामागे असल्याचा आरोपही केला. यावेळी अमरसिंह पंडित, विरेंद्र सोळंके, जयसिंग सोळंके, जयदत्त नरवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी निलम बाफणा, तहसिलदार वर्षा मनाळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news