बीड : अंबाजोगाईत बहिणीपेक्षा भाऊ सरस; तीन ग्रामपंचायतींवर धनंजय मुंडे गटाची बाजी | पुढारी

बीड : अंबाजोगाईत बहिणीपेक्षा भाऊ सरस; तीन ग्रामपंचायतींवर धनंजय मुंडे गटाची बाजी

अंबाजोगाई; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील चार ग्रामपंचायतच्या निवडणुका रविवारी पार पडल्या. या निवडणूकीसाठी पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्या गटाने प्रतिष्ठा पणाला लावली होती. परंतु धनंजय मुंडे यांच्या गटाला तीन ग्रामपंचायती मिळविण्यात यश आले आहे. तर तालुक्यातील महत्वाच्या जिल्हा परिषद गटाची राडी ग्रामपंचायत पंकजा मुंडेंना कायम ठेवण्यात यश आले आहे.
बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायतची निवडणूक रविवारी पार पडली. यात १८ गावांनी निवडणूक कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता.  ग्रामपंचायत निवडणुकीत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना तीन ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यात यश आले आहे. याबरोबर अंबाजोगाई तालुक्यातील जिल्हा परिषद गट असलेली राडी ग्रामपंचायत मिळवण्यात पंचायत समितीचे माजी सभापती प्रदिप गंगणे यांच्या पॅनलला यश आले आहे. तसेच पालकमंत्री मुंडे यांचा खंदे समर्थक असलेला बाळासाहेब सोनवणे यांची डिघोळ अंबा ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात यश आले आहे. तर बागझरी व राडी-तांडा ही पालकमंत्र्यांच्या ताब्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील चार ग्रामपंचायत निवडणूक निकालावरून बहिणी पेक्षा भाऊच सरस ठरल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
मराठा आरक्षणामुळे काही ग्रामपंचायतींनी निवडणूक प्रक्रियेवरून बहिष्कार टाकला असला तरी या ग्रामपंचायतीवर आता प्रशासक कार्यभार सांभाळणार आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांना राजकीय पुनर्वसन करायचे असेल तर त्यांनी गाव पातळीपर्यंत संपर्क ठेवला पाहिजे, अशीच भावना त्यांच्या समर्थकातून व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :

Back to top button