छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई; ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड, २५० कोटींचे अंमली पदार्थ जप्त | पुढारी

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई; ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड, २५० कोटींचे अंमली पदार्थ जप्त

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात ड्रग माफिया ललित पाटील प्रकरण गाजत असतानाच अहमदाबाद गुन्हे शाखा (डीसीबी) आणि महसूल गुप्तचर संचालनालय, अहमदाबाद यांनी संयुक्तपणे छत्रपती संभाजीनगरात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आज (दि.२२) पहाटे केली. एका ड्रग्स रॅकेटचा भंडाफोड केला आहे. येथील कारखान्यावर अचानक छापा टाकत त्यांनी तब्बल २५० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले. यासह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील एकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दुसऱ्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केटामाइन, एमडी ड्रग्स, कोकेनसारख्या अंमली पदार्थांचा मोठा साठा असल्याची माहिती अहमदाबाद गुन्हे शाखा आणि महसूल गुप्तचर संचालनालयाला मिळाली होती. त्यानुसार एमआयडीसी वाळुज भागातील गीता केमिकल या कंपनीवर आज पहाटे छापा मारला. या छाप्याबाबत डीआरआय आणि डीसीबीच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. दरम्यान याप्रकरणी जितेशकुमार प्रेमजीभाई हिनोरीया (रा. गोलवाडी) आणि संदीप शंकर कुमावत (४०, रा. वाळूज) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. याचवेळी हिनोरीया याने टोकाचे पाऊल उचलले. त्याला पोलिसांनी तत्काळ एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे. या कंपनीतून अंमली पदार्थ व्यतिरिक्त, ड्रग्स बनवण्यासाठी वापरलेला कच्चा माल आणि २५० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची उपकरणे संयुक्त पथकाने जप्त केली आहेत.

 ड्रग्सची आंतरराज्यीय टोळी

आरोपी हे प्रतिबंधित पदार्थ तयार करत होते. जे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांसह इतर राज्यांमध्ये वितरीत केले जात होते. काही महिन्यांपूर्वी ड्रग्स जप्त केल्यानंतर डीसीबीची गुप्तचर यंत्रणा कामाला लागली होती. यात रविवारी अहमदाबाद गुन्हे शाखा आणि डीआरआयला मोठे यश मिळाले. छत्रपती संभाजीनगरातून ५०० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ३ वेगवेगळ्या कंपन्यांवर छापे टाकून हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.

कारवाईत जप्त केलेला मुद्देमाल

-23 किलो कोकीन
-2.9- नेफेड्रोन आणि
-30 लाख रुपये रोकड
-असा एकूण सुमारे २५० कोटी रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा 

Back to top button