Lalit Patil : ललितचा जोडीदार गोलू करायचा ड्रगची वाहतूक, व्यापार अन् विक्री | पुढारी

Lalit Patil : ललितचा जोडीदार गोलू करायचा ड्रगची वाहतूक, व्यापार अन् विक्री

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ड्रग तस्कर ललित पाटील याचा साथीदार रेहान ऊर्फ गोलू आलम सुलतान अहमद अन्सारी (वय 26) हा ड्रग्जच्या वाहतुकीसह त्याची विक्री व व्यापार करीत होता. नाशिक येथील श्री गणेशाय एंटरप्रायझेस नावाच्या केमिकल कंपनीमार्फत गोलू हे काम करीत होता. यामध्ये इम—ान शेख हा गोलूकडून ड्रग खरेदी करून ते पुणे, मुंबईसह राज्यातील अन्य शहरांत विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली. दरम्यान, न्यायालयाने रेहान ऊर्फ गोलूला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

रेहान उर्फ गोलू अन्सारी याला नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहातून ट्रान्झिट रिमांडद्वारे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. गोलू हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. तो ड्रग्जची वाहतूक, व्यापार व विक्री करीत होता. तपासासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील नीलिमा यादव-इथापे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

हेही वाचा

Pune News : पुणे बाजार समितीची होणार तपासणी; पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निर्णयाने खळबळ

Dalip Tahil Jail : अभिनेता दलीप ताहिल यांना 2 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!

मोदींकडून महिलाशक्तीला कायम प्राधान्य : चंद्रशेखर बावनकुळे

Back to top button