पुढारी ऑनलाईन डेस्क : हमासाच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबरला इस्रायलवर ५ हजार रॉकेट डागले, शिवाय इस्रायलमध्ये घुसून अंधाधूंद गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यात १४०० इस्रायली नागरिक मृत्युमुखी पडले, तर सुमारे १२० नागरिकांना हमासने बंधक बनवले आहे. या हल्ल्यासंदर्भात एक धक्कादायक माहिती समाेर आली आहे. (Hamas terrorist took drugs)
७ ऑक्टोबर राेजी हल्ला करताना हमासच्या दहशतवाद्यांनी ड्रग्जचे सेवन केले होते. या ड्रग्जच्या अंमलाखाली असलेल्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या भूमीवर अक्षरशः थैमान घातले. हे हाेते ड्रग्ज कॅप्टॉगॉन. या ड्रग्जला (अमली पदार्थ) गरिबांचे कोकेन असेही म्हटले जाते. दक्षिण युरोपमध्ये या ड्रग्जची निर्मिती होते. तुर्कीतून हे ड्रग्ज अरब राष्ट्रांत येते. जेरुसलेम पोस्ट आणि चॅनल १२ या दोन वेबसाईटने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. इस्रायलने दिलेल्या प्रत्युत्तरात यातील बरेच दहशतवादी मारले गेले, या दहशतवाद्यांच्या खिशातून कॅप्टॉगॉनच्या गोळ्या मिळाल्या आहेत. हे ड्रग्ज घेतल्यानंतर डोके थंड राहाते, आपण काय करत आहोत, याचे भान संबंधित व्यक्तीला नसते.
कॅप्टॉगॉन ड्रग्ज इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी २०१५मध्ये वापरले होते. सध्या लेबनॉन आणि सीरियात हे ड्रग्ज बनवले जाते, असे या वृत्तात म्हटले जाते. सीरियात या ड्रग्ज निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली जाते, त्याला लेबनॉनमधील हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचे पाठबळ आहे. २०२१मध्ये द न्यू यॉर्क टाइम्स या वृत्तपत्रानेही या सिंडेकटचा पदार्फाश केला होता.
७ ऑक्टोबर पासून हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष अजून सुरुच आहे. त्यामुळे गाझामधील मधील मृतांची संख्या ४१३७ इतकी झाली आहे. शिवाय, गाझामध्ये १३ हजारहून अधिक लोक जखमी झाले आहेत. याबाबतची माहिती पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला. यानंतर इस्रायलकडून गाझा येथे बॉम्बहल्ले करण्यात आले आहेत.
हेही वाचा