छत्रपती संभाजीनगर : ५० सीसीटीव्ही तपासल्यावर सापडले मजुराचे मारेकरी | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : ५० सीसीटीव्ही तपासल्यावर सापडले मजुराचे मारेकरी

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा ४ ऑक्टोबर रोजी मजुराचा निर्घृण खून करण्यात आला होता. हर्सूल पोलिसांनी पाच दिवसात ५० सीसीटीव्ही तपासून आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दोघांना गजाआड केले. लूटमारीच्या उद्देशाने मजुराचा खून केला असावा, असा अंदाज हर्सूल ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी वर्तविला आहे. सुरेश हरिभाऊ जावळे (वय 40, रा. देहाडेनगर, अंबरहिल) असे मृताचे नाव आहे.

नीलेश महेंद्र साळवे (29, रा. संकट मोचन शिवमंदिर, जुनी मुकुंदवाडी), शेखर उर्फ निखिल फकीरचंद जोंधळे (वय 26, रा. पोलीस कॉलनी, मुकुंदवाडी) अशी अटकेतील संशयीत आरोपींची नावे आहेत.

सुरेश हरिभाऊ जावळे (वय 40, रा. देहाडेनगर, अंबरहिल) असे मृताचे नाव आहे. तो मिळेल ते मजुरीकाम करून उदरनिर्वाह करीत होता. आईसोबत तो राहत होता, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली. अधिक माहितीनुसार, राजू आसाराम प्रधान (40, रा. हर्षनगर, लेबर कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. मृत सुरेश जावळे हा राजू प्रधान यांचा आतेभाऊ होता. त्यांना सुरेश जावळे हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी गेले. तेथे गेल्यावर जावळेला पोलिसांनी घाटीत दाखल केल्याचे समजले. ते घाटीत गेले असता, डॉक्टरांनी सुरेश जावळेला मृत घोषित केल्याची माहिती मिळाली. दरम्यान, उपनिरीक्षक मारुती खिल्लारे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक पोतदार करीत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button