पाणी..पाणी..तहानेने व्याकुळ वानराची पाण्यासाठी कसरत.. | पुढारी

पाणी..पाणी..तहानेने व्याकुळ वानराची पाण्यासाठी कसरत..

अजिंठा; पुढारी वृत्तसेवा अजिंठा परिसरात उन्हाचा पारा चाळीस अंशावर गेला आहे. या वाढत्‍या तापमानामुळे जिवाची लाहीलाही होत आहे. उष्णतेच्या प्रकोपासून वाचण्यासाठी सर्वच जीवांची घालमेल होत आहे. माणसे उष्‍णता असह्य झाली की सावलीची ठिकाणे शोधतील, तहान लागली की थंडगार पाणी पितील, थंड पेयांचा आस्‍वाद घेतील. उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी आणि उन्हापासून संरक्षणासाठी टोपी, स्‍कार्पचा वापर करतील. मात्र मुक्या प्राण्यांचे काय? राणावनातील मुक्‍या जीवांची तीव्र उन्हाळा आणि पाण्याअभावी तडफड होते. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याविना या जीवांचे हाल होतात. काही मुक्‍या प्राण्यांचा पाण्याविना जीव ही जातो.

मग जंगलात पाणी मिळत नसल्याने वन्यप्राणी गाव शहराकडे मानवी वस्‍तीवर धाव घेतात. तहान भागवताना एका वानराला अशी कसरत करावी लागली. तहानेने व्याकुळ झालेल्‍या वानराची पाणी पिण्यासाठी चाललेल्‍या धडपडीचा फोटो उन्हाळ्याच्या दाहकतेचे दर्शन घडवते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

Back to top button