परभणी : महिलेचा विनयभंग करत पतीला मारहाण | पुढारी

परभणी : महिलेचा विनयभंग करत पतीला मारहाण

चारठाणा; पुढारी वृत्तसेवा : सेलु तालुक्यातील कुडा येथे एका महिलेचा विनयभंग करत पतीला मारहाण केली व दोघांना जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बुधवारी (दि.५) घडली. याप्रकरणी सुशीलाबाई नारायण कांदे यांच्या फिर्यादीवरून चारठाणा पोलीस ठाण्यात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंडीत निळोबा घुगे, ज्ञानदेव पंडीत घुगे व लक्ष्मण पंडीत घुगे (रा.जांब, ता. जिंतुर) अशी संशयितांची नावे असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिलेचा पती बुधवारी सकाळी गावात गेला होता. यावेळी पंडीत घुगे यांनी पिडीतेच्या घरी प्रवेश केला आणि पिडीतेच्या हाताला धरुन विनयभंग केला. त्याच दरम्यान पिडीतेचा पती व आई घरी आले असता ज्ञानदेव घुगे व लक्ष्मण घुगे यांनी त्यांना मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी जांब येथील पंडीत घुगे, ज्ञानदेव घुगे व लक्ष्मण घुगे यांना पोलिसांनी अटक केली आहे. घटनेनंतर पोलीस हे. कॉन्स्टेबल सिध्दार्थ आचार्य, रामकिशन कोंडरे, संजय पवार यांनी घटनास्थळी भेट दिली.

हेही वाचा : 

Back to top button