जालना : घनसावंगी येथे ऊसाची ट्रॅक्टर ट्रॉली पलटी | पुढारी

जालना : घनसावंगी येथे ऊसाची ट्रॅक्टर ट्रॉली पलटी

घनसावंगी; पुढारी वृत्तसेवा : समृध्दी साखर कारखान्याकडे ऊस घेऊन निघालेला ट्रॅक्टर घनसावंगी शहरातील अंबड कुंभार पिपळगाव मार्गावरील घनसावंगी शहरातील जुने बसस्थानक परिसरात उभ्या कारवर ऊसाचा ट्रॅक्टर पलटी होऊन कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, बारसवाडा येथुन ट्रॅक्टर दोन ट्रॉलीमध्ये ऊस भरून कारखान्याकडे निघाला होता. महामार्गावरील . जुने बसस्थानक परीसरात एक चारचाकी उभी होती. दरम्यान ऊसाने भरुन चाललेली ट्रॉली या चारचाकीवर पलटी झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सध्या गळती हंगाम सुरु असल्याने मोठ्या प्रमाणावर ऊसाची वाहतूक सुरु आहे. ट्रॉलीमध्ये अचानक बिघाड होऊण अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. या आपघातात तोडलेला ऊस रस्त्यावर विस्कटल्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर ट्रॉलीसह कारचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने कारमध्ये प्रवासी नसल्याने जिवीत हानी टळली. शाळा सुटण्याची वेळ आसल्याने विध्यार्थी यांची वर्दळ असते. मात्र कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याने  मोठा आणर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच घनसावंगी पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.

Back to top button