परभणी : मानवत तालुक्यात ७५ टक्के मतदान | पुढारी

परभणी : मानवत तालुक्यात ७५ टक्के मतदान

मानवत; पुढारी वृत्तसेवा : राज्यभरामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडाला असून त्या अंतर्गत मानवत तालुक्यात आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ७५ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

तालुक्यातील रत्नापूर ७१ टक्के, मानोली ६३ टक्के, सोनुळा बिनविरोध, कोल्हावाडी ९१ टक्के, वझुर बुद्रुक ७७ टक्के, आंबेगाव चाहारूम ८६ टक्के, ईरळद ७६ टक्के व देवलगाव आवचार ८६ टक्के या आठ गावांमध्ये निवडणुक पार पडली. या मतदानामध्ये तालुक्यातील सोनुळा हे गाव यापूर्वीच निकाल बिनविरोध आल्याने सात गावातील साडेतीन वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी प्राप्त झाली आहे.

या आठ गावात एकूण ६६ सदस्यांसाठी मतदान झाले. यात एकूण १०५६३ मतदारांची संख्या आहे. सर्वात कमी सोनूला या गावात ४८८ मतदार असून सर्वात जास्त मानोली या गावात २३२६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

हेही वाचा;

Back to top button