हिंगोली : बालविवाह रोखणे ही काळाची गरज : रूपाली चाकणकर    | पुढारी

हिंगोली : बालविवाह रोखणे ही काळाची गरज : रूपाली चाकणकर   

जवळा बाजार; पुढारी वृत्तसेवा : राज्यात मागील दोन वर्षांमध्ये बालविवाहाच्या प्रमाणात वाढ झालेली आहे, हे रोखने आजच्या काळाची गरज आहे. महात्मा गांधीजींच्या जयंती दिवशी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीने बालविवाह रोखण्यासाठी ठराव करावेत, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केले. येथील युवक महिला संवाद व जनकल्याण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा कारभार मागील दहा महिन्यांपासून घेतलेला आहे. गेल्या दहा महिन्यांमध्ये राज्यात होत असलेली हुंडाबळी, बालविवाह, मुलींची छेडछाड, स्त्रीभ्रूणहत्या अशा विविध बाबींवर आळा घालून कारवाई करण्यात यावी, यासाठी काम करत आहे. पण मागील दोन वर्षांपासून ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात बालविवाहाच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. हे बालविवाह तात्काळ रोखणे काळाची गरज आहे. यासाठी महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायतींमध्ये होणाऱ्या ग्रामसभांमध्ये बालविवाहांवर निर्बंध घालण्यासाठी ठराव घेणे काळाची गरज आहे. मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांना आत्मविश्वास देण्याची गरज आहे. तरच मुलगी ही प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होऊ शकते, असेही त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयप्रकाश दांडेगावकर होते. यावेळी आमदार राजूभैया नवघरे, शेख मेहबूब भाई, मोहम्मद खा. पठाण, दिलीप चव्हाण, संजय दराडे, धोंडीरामजी अंभोरे, विलास जगताप, अंबादासराव भोसले, मनीष आखरे, अनिल पतंगे, महादेव आप्पा ऐकलारे, रत्नमालाताई चव्हाण, बाळूमामा ढोरे, तान्हाजी बेंडे, मदनराव कऱ्हाळे, सुमित्राताई टाले, गौतम दवणे, बि.डी.कदम, भगत प्रियांका, डॉ. सुभाष बोंडे, फारुख भाई, त्र्यंबकराव कदम, चंद्रकांत बागल, बाळासाहेब गायकवाड, जावेद राज, बाबुराव दळवी, ज्ञानेश्वर दशरथे, जिजामामा हारने, मुंजाजी दळवी, बबलू चव्हाण, राजकुमार  झांझरी आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button