औरंगाबाद येथे आयकर विभागाची छापेमारी  | पुढारी

औरंगाबाद येथे आयकर विभागाची छापेमारी 

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : औरंगाबादमध्ये आज (बुधवारी) सकाळी आयकर विभागाने धाडी टाकल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. येथील ज्योतीनगर परिसरातील एका व्यावसायिकाच्या घरावर पुणे येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी झाडाझडती सुरू केली आहे. पहाटे चार पासून कागद पत्रांची तपासणी सुरू असुन हा व्यापारी एका राजकिय पक्षाशी संबंधित व्यक्तीचा नातेवाईक असल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर अन्य दोन ते तीन ठिकाणी आयकर विभागाकडून धाडी टाकण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : 

Back to top button