Asia Cup 2022 : अफगाणिस्तानने पाकिस्तानविरुद्ध सामना जिंकल्यास भारताला संधी

Asia Cup 2022 : अफगाणिस्तानने पाकिस्तानविरुद्ध सामना जिंकल्यास भारताला संधी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया कपमध्ये (Asia Cup 2022)  आज टॉप ४ साठी पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान (PAK vs AFG) यांच्यात सामना होणार आहे. हा सामना भारतीय चाहत्यांसाठी आणि भारतीय संघासाठी खूप महत्वाचा आहे. आजच्या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला तर भारताचा आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग बंद होईल. अफगाणिस्तान संघाने या सामन्यात विजय मिळवल्यास भारताचा अंतिम फेरी गाठण्याचा मार्ग मोकळा होवू शकतो. अशा स्थितीत आज भारतीय क्रिकेटचे चाहते अफगाणिस्तानने विजयासाठी प्रार्थना करत असतील. हा सामना शारजाहच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांमध्ये टी-20 क्रीडा प्रकारात आतापर्यंत फक्त २ वेळा आमने-सामने आले आहेत, या सांमन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानवर विजय मिळवला आहे.

आशिया चषकात पाकिस्तानच्या संघाने ग्रुप स्टेजमध्ये २ सामने खेळले, त्यामध्ये त्यांना एका सामन्यात विजय मिळवला आहे, तर भारतविरूद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. एक जिंकला आणि एक सामना गमावला. त्याचवेळी अफगाणिस्तानने दोन्ही सामने जिंकले आहेत. याशिवाय टॉप ४ टप्प्यातील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानला श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला. तर पाकिस्तानने भारताचा पराभव केला. या सामन्यात राशिद खान, हजरतुल्ला झाझाई आणि रेहमानुल्ला गुरबाज या महत्वाच्या खेळाडूवर अफगाणिस्तनच्या विजयाची धुरा असणार आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानला विजय मिळवायचा असेल तर, राशिद खानला ऐतिहासिक कामगिरी करावी लागेल. त्याला पाकिस्तानी फलंदाजांना आपल्या गोलंदाजीने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवावा लागणार आहे. त्याचबरोबर हजरतुल्ला जझाई, रहमानउल्ला गुरबाज या फलंदाजांना दमदार फलंदाजी करावी लागणार आहे. तसेच कर्णधार मोहम्मद नबीकडून अष्टपैलू कामगिरी करून संघाला विजय मिळवून देण्याचे काम संघाला करावे लागणार आहे.

विजयाची जबाबदारी पाकिस्तानी गोलंदाजांवर

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाज शानदार कामगिरी करू शकतात. हाँगकाँगविरुद्ध पाकिस्तानच्या गोलंदाजांनी जी कामगिरी केली, त्याच कामगिरीची आजच्या सामन्यात पुनरावृत्ती करताना आपल्याला दिसतील. आजच्या सामन्यात सर्वांची नजर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमवर असणार आहे. बाबरसाठी आशिया चषक आतापर्यंत चांगला राहिलेला नाही. हा सामना जिंकून पाकिस्तान आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना आपल्याला दिसेल. (Asia Cup 2022 )

दोन्ही संघातील संभाव्य खेळाडू

अफगाणिस्तान : हजरतुल्ला झाझाई, रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम जद्रान, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी (कर्णधार), करीम जनात, रशीद खान, समिउल्लाह शिनवारी, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान, फझलहक फारूकी

पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फखर जमान, खुशदिल शाह, आसिफ अली, मोहम्मद नवाज, इफ्तिखार अहमद, शादाब खान, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news