Bharat Jodo yatra : अशी असेल राहुल गांधींची ‘भारत जोड़ो यात्रा’

Bharat Jodo yatra : अशी असेल राहुल गांधींची ‘भारत जोड़ो यात्रा’
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काँग्रेसचे माजी अध्‍यक्ष राहुल गांधी यांची बहुचर्चित 'भारत जोडो यात्रे'ला ( Bharat Jodo yatra ) आजपासून प्रारंभ होत आहे. २०२४च्‍या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला एकजूट करणे आणि कार्यकर्ते-पदाधिकार्‍यांमध्‍ये नवा उत्‍साह निर्माण करणे हा या यात्रेचा उद्‍देश आहे. काँग्रेस पक्षासाठी महत्त्‍वपूर्ण असणार्‍या या यात्रेचे स्‍वरुप कसे असेल याविषयी जाणून घेवूया …

Bharat Jodo yatra : १५० दिवस चालणार यात्रा

राजकीय विश्‍लेषकांच्‍या मतानुसार, काँग्रेसने २०२४ लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. १५० दिवस
चालणार्‍या भारत जोड़ो यात्रेत राहुल गांधी यांच्‍यासोबत ३०० जणांचा ताफा असेल. या काळात राहुल गांधी यांचा मुक्‍काम  फिरत्‍या कंटेनरमध्‍ये असेल. या कंटेनरमध्‍ये बेड, टॉयलेटसह एखाद्‍या खोलीस जशी सुविधा असते अशी सुविधा असेल. देशातील १२ राज्‍यांमधून ही यात्रा प्रवास करेल. पाच महिन्‍यांच्‍या या काळात प्रत्‍येक राज्‍यातील हवामान वेगळे असेल.या विचार करुन कंटेनरमध्‍ये व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.

दरराेज नवीन गावी मुक्‍काम

कन्‍याकुमारी ते काश्‍मीर असा ३५७० किलोमीटर प्रवास करणारी भारत जोडो यात्रेनिमित्त राहुल गांधी यांचा दररोज नवीन गावात मुक्‍कामी असेल.त्‍यांच्‍यासोबत असणारे निवड नेते आणि कार्यकर्ते मुक्‍कामी असतील. या यात्रेत एकुण ६० कंटेनर असतील. हे सर्व कंटेनर राहुल गांधी मुक्‍काम करणार्‍या गावी आधी पोहचतील. राहुल गांधी यांना असणार्‍या सुरक्षेनुसार ते स्‍वतंत्र कंटेनरमध्‍ये मुक्‍काम करतील. यात्रेत सहभागी झालेल्‍या ६० कंटेनरपैकी एका कंटेनरमध्‍ये १२ जण विश्रांती घेवू शकतात. संपूर्ण यात्रेत राहुल गांधी यांच्‍यासोबत असणारेच त्‍यांच्‍यबरोबर भोजन करतील.

दररोज २२ ते २३ किलोमीटर पदयात्रा

कन्‍याकुमारीमधून प्रारंभ होणार्‍या भारत जोडो यात्रेत राहुल गांधी दररोज सुमारे २२ ते २३ किलोमीटर पायी चालणार आहेत. दररोज सकाळी ७ वाजता यात्रेला प्रारंभ होणार असून १० वाजेपर्यंत पायी प्रवास होईल. यानंतर काही तास विश्रांती घेतली जाईल. दुपारी साडेतीन वाजता पुन्‍हा पदयात्रा सुरु होवून मुक्‍काम असणार्‍या गावापर्यंत  ७ वाजेपर्यंत पाेहचेल.

यात्रेत होणार ११७ नेते सहभागी

या यात्रेसाठी संपूर्ण देशातून काँग्रेसच्‍या ११७ नेत्‍यांची यादी तयार करण्यात आली आहे. ते पूर्ण यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत राहतील. याशिवाय ज्या राज्यातून ही यात्रा जाणार आहे तेथील १०० नेते आणि कार्यकर्ते यात्रेत सहभागी होतील. सुरक्षा रक्षक, पक्षाच्‍या जनसंपर्क टीम, फोटोग्राफर, काँग्रेसची सोशल मीडिया टीम आणि वैद्‍यकीय पथकाचाही यात्रेत सहभाग असेल.

नास्‍टा आणि जेवण बहुतांशवेळा नेते स्‍वत:च तयार करतील

भारत जोडो यात्रेत सहभागी झालेले काँग्रेसचे नेते बहुतांश वेळा आपला नास्‍टा आणि जेवण स्‍वत:च तयार करतील. काही ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी जेवणाची व्‍यवस्‍था करतील. राहुल गांधी यांच्‍या समवेत असणार सर्वजण एका तबुंत बसून नास्‍टा आणि जेवण करतील. येथे बाहेरील व्‍यक्‍तीला प्रवेश असणार नाही.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news