बीड : परळी-गंगाखेड रस्त्यावर रुग्णवाहिकेचा अपघात; चालक ठार | पुढारी

बीड : परळी-गंगाखेड रस्त्यावर रुग्णवाहिकेचा अपघात; चालक ठार

परळी वैजनाथ; पुढारी वृत्तसेवा : परळी-गंगाखेड रस्त्यावरील दगडवाडी जवळ झालेल्या रुग्णवाहिकेच्या अपघातात चालक जागीच ठार झाला. गजानन चिलगर असे मृत चालकाचे नाव आहे. ही घटना आज सकाळी नऊच्या सुमारास घडली असून घटनेची नोंद परळी ग्रामीण पोलिसांत झाली आहे.

‌‌पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गंगाखेड येथील रुग्णवाहिका एका रुग्णाला अंबाजोगाई येथे सोडून परत गंगाखेडकडे जात होती. दगडवाडी जवळील चढावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रुग्णवाहिका रस्त्याच्याकडेला पलटी झाली. यामध्ये रुग्णवाहिकेचा चालक गजानन हा जागीच ठार झाला. परळी ग्रामीण पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह परळी उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.

हेही वाचा :

Back to top button