उस्मानाबाद : गाय आडवी आल्याने दोन वाहनांत धडक; आठ जखमी | पुढारी

उस्मानाबाद : गाय आडवी आल्याने दोन वाहनांत धडक; आठ जखमी

कळंब, पुढारी वृत्तसेवा: औरंगाबाद- धुळे राष्ट्रीय महामार्गावर चोराखळीजवळ गुरूवारी सकाळी अकराच्या सुमारास दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक होवून ८ जण जखमी झाले. महामार्गावर अचानक गाय आडवी आल्याने तिला वाचविण्याच्या प्रयत्नात उस्मानाबाद उपप्रादेशिक परिवहन विभागाचे वाहनाने येरमळाहून उस्मानाबादकडे येत असलेल्या मारुती गाडीला जोराची धडक दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील तालुका स्तरावर उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे शिबिर घेण्यात येत आहे. त्यानुसार परिवहन विभागाचे इन्स्पेक्टर शिंदे, मोटार वाहन निरीक्षक होले, चालक बाळासाहेब काळे हे शिबिरासाठी भूमकडे वाहन (क्रमांक एम. एच ०६ Aw ४३०१) ने जात होते. महामार्गावर चोराखळीजवळ आल्यावर अचानक गाय आडवी आली. तिला वाचविण्याचा प्रयत्नात येरमळ्याहून उस्मानाबादकडे येत असलेली मारुती कारला (क्रमांक एम. एच.१२ पी.एच २५०३) आरटीओच्या वाहनाची जोरात धडक दिली. प्रथमदर्शनी वाहनाचा ताबा सुटून दुसऱ्या बाजूस असलेल्या मारुती कारला जाऊन धडकल्याचे निदर्शनास आले आहे.

तालुक्यातील चोराखळी नजिक राष्ट्रीय महामार्गवर झालेल्या विचित्र अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य ७ जण जखमी झाले आहेत. जखमींना उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये दोन महिला, तीन पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. तर प्रादेशिक परिवहन विभागाचे चालक बाळासाहेब काळे यांची परस्थिती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button