जिंतूर : पुंगळा येथे विषारी औषध प्राशन करून युवकाची आत्महत्या | पुढारी

जिंतूर : पुंगळा येथे विषारी औषध प्राशन करून युवकाची आत्महत्या

जिंतूर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पुंगळा येथील शुभम भाऊराव जगताप (वय २४, रा. पुंगळा ) या युवकाने आपल्या शेतात गुरूवारी (दि. १७) सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

प्राथमिक उपचारासाठी वडिलांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात परभणी येथे पाठविले. परंतु बोरीच्या दरम्यानच सदर युवकाचा मृत्यू झाल्याने परत जिंतूर ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. जिंतूर येथे वैद्यकीय अधिकारी काळे यांनी शवविच्छेदन करून सदर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. शुभमचा चारचाकी गाडी भाड्याने देण्याचा व्यवसाय होता. पुंगळा येथे त्याच्यावर अंत्यविधी करण्यात आले. या युवकाच्या पश्चात आई-वडील भाऊ असा परिवार आहे. जिंतूर पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : दुष्काळ ते 300 एकर ऊस लागवड करण्याऱ्या हिंगणगावाची गोष्ट

Back to top button