नाशिकमध्ये करवसुलीसाठी ‘घरपट्टी विभाग आपल्या दारी’ उपक्रम | पुढारी

नाशिकमध्ये करवसुलीसाठी ‘घरपट्टी विभाग आपल्या दारी’ उपक्रम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मार्चअखेरमुळे करवसुलीकरिता मनपाच्या कर आकारणी विभागाकडून प्रयत्नांची पराकाष्टा केली जात असून, सिडको विभागांतर्गत येणार्‍या पाथर्डी घरपट्टी उपकार्यालयातर्फे ’घरपट्टी विभाग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

सिडको विभागीय कार्यालयांतर्गत पाथर्डी घरपट्टी उपकार्यालयातर्फे घरपट्टी, पाणीपट्टी मिळकत थकबाकीदारांकडून करवसुलीसाठी कर विभागाच्या उपआयुक्त अर्चना तांबे तसेच विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील स्वत: मैदानात उतरले आहेत. पाथर्डी उपविभागीय कार्यालयातर्फे दोनदिवसीय वसुली मोहीम राबविण्यात आली. या वसुली मोहिमेत थकबाकीबरोबर चालू बिल भरण्यासाठी अभियान राबविण्यात आले. अभियानचे उद्घाटन उपआयुक्त अर्चना तांबे व डॉ. मयूर पाटील यांच्यामार्फत हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. यावेळी पाथर्डी घरपट्टी उपकार्यालयाकडील विविध भागांत मोहीम राबवून चित्ररथाद्वारे ’घरपट्टी विभाग आपल्या दारी’ या संकल्पनेतून मालमत्ताधारकांना ’कर भरा, सहकार्य करा, दंडात्मक कारवाई टाळा, असे आवाहन करण्यात येत आहे.

जनजागृती रॅलीदरम्यान करधारकांकडून थकीत व चालू घरपट्टी व पाणीपट्टीचा भरणा करून घेतला जात असून, मिळकतींस घरपट्टी लागली आहे किंवा नाही याबाबतचे मार्गदर्शन केले जात आहे. अभियानप्रसंगी अधीक्षक सुनील आव्हाड, सहायक अधीक्षक भवर दशरथ, अंबादास विधाते, यशवंत लहामगे, राजू कवर, राजेंद्र मौले, संतोष गायकवाड, आनंद जाधव व दीपक कोथमिरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र मोरे यांनी केले.

हेही वाचा :

Back to top button