‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना वाय दर्जाची सुरक्षा | पुढारी

'द कश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना वाय दर्जाची सुरक्षा

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना केंद्रीय गृह मंत्रालयाने वाय दर्जाची सुरक्षा (Y category security) पुरवली आहे. या सुरक्षा व्यवस्थेत सीआरपीएफचे सुरक्षा कवच असते. विवेक अग्निहोत्री यांना काही लोकांकडून धमक्या आल्या होत्या. याबाबत गुप्तचर विभागाने दिलेल्या अहवालाच्या आधारे गृह मंत्रालयाने अग्निहोत्री यांनी वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे.

Y दर्जाच्या सुरक्षेत एकूण ८ सुरक्षा कर्मचारी तैनात केले जातात. एखाद्या व्यक्तीला कोणत्या दर्जाची सुरक्षा पुरविली जावी याबाबत गुप्तचर विभागाच्या अहवालाचा आधार घेऊन त्याचे मूल्यांकन करण्यात येते. झेड प्लस दर्जाची सुरक्षा ही सर्वात वरची समजण्यात येते. त्यानंतर झेड, वाय आणि एक्स या दर्जाच्या सुरक्षा व्यवस्था येतात.

‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट काश्मिरातील पंडितांवरील झालेल्या अत्याचाराचे वास्तव चित्रण दाखवणारा चित्रपट आहे. हा चित्रपट बहुतांश राज्यांमध्ये टॅक्स फ्री करण्यात आला आहे.

द कश्मीर फाईल्स : गिरिजा टिक्कू – आधी गँगरेप मग निर्घुण खून, बघून थरकाप उडेल

काश्मीरचं सत्य दडपण्याचा प्रयत्न झाला. जे घडलं ते सत्य दाबलं गेलं. ते कधीचं बाहेर आलं नाही. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द कश्मीर फाइल्स चित्रपटाचे कौतुक केले होते. भाजपच्या संसदीय बैठकीत नरेंद्र मोदींनी ‘द काश्मीर फाइल्स’चा उल्लेख केला होता. ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सध्या देशात खूप चर्चेत आहे.

Back to top button