बीड : दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू | पुढारी

बीड : दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

केज; गौतम बचुटे : केज तालुक्यातील लाडेवडगाव येथे (दि. २७) दोन सख्ख्या भावांचा शेत तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. केज तालुक्यातील दोन दिवसातील ही सलग दुसरी घटना आहे. दोन दिवसात केज तालुक्यातील युसूफ वडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील या दोन घटनेत तीन मृत्यू झाले आहेत.

 

अधिक वाचा :

 

अधिक माहिती अशी की, आज मंगळवारी दुपारी  १२:३० वाजताच्या दरम्यान केज तालुक्यातील लाडेगाव येथे रोकड पट्टी नावाने ओळखल्या जात असलेल्या शेतातील शेत तळ्यात दोन सख्खे भाऊ बुडाले. या दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हर्षद माधव लाड (वय १०) आणि उमेद माधव लाड (७) अशी त्या दोन भावांची नावे आहेत.

अधिक वाचा :

 

तर काल, सोमवारी (दि. २६) शेलगाव गांजी येथे आकांक्षा रेवनसिद्ध पटणे (११) या मुलीचा श्रीमंत पटणे यांच्या शेतातील तलावात बुडून मृत्यू झाला. युसूफ वडगाव पोलिस स्टेशन हद्दीतील दोन दिवसातील सलग दुसरी घटना असून या दोन्ही घटनेत एकूण तीन मुले दगावली आहेत.

अधिक वाचा :

Back to top button