पाॅर्नोग्राफी आणि इरोटीका यामध्ये फरक काय? | पुढारी

पाॅर्नोग्राफी आणि इरोटीका यामध्ये फरक काय?

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पाॅर्नोग्राफी प्रकरणामुळे चर्चेचा केंद्रस्थानी आहे. त्याच्या प्रकरणामुळे पाॅर्नोग्राफी हा शब्द वारंवार समोर येत आहे. मात्र, कलाविश्वात पाॅर्नोग्राफी आणि इरोटीका या संकल्पना आहे. बऱ्याच वेळेला पाॅर्नोग्राफी म्हणजेच इरोटीका समजलं जातं. पण, तसं नाही. पाॅर्नोग्राफी आणि इरोटीका यामध्ये नेमका फरक काय, ते आपण सविस्तर जाणून घेऊ या…

लुसी फिशर या अमेरिकन चित्रपटविश्वात प्रसिद्ध निर्मात्या म्हणून ओळखल्या जातात. लुसी फिशर यांच्यावर एकेकाळी केवळ महिला आणि नोकरदार माता, यावर भाष्य करणाऱ्या निर्मात्या म्हणून ठपका ठेवण्यात आला होता. लुसी फिशर एकदा म्हणाल्या होत्या की, “इरोटीका (शृंगारिकता) ही मुलायम रेशमासारखी असते. तर, पाॅर्नोग्राफी (अश्लील साहित्य) ही नायलाॅनसारखी असते. इरोटीका ही आमच्यासारख्या मध्यवर्गीय सुशिक्षीत लोकांसाठी असते आणि पाॅर्नोग्राफी हे एकटं पडलेलं, अप्रिय असलेलं आणि अशिक्षित लोकांसाठी असते.”

यापूर्वी इरोटीका आणि पाॅर्नोग्राफी यामध्ये कधी फरक केलेला नसल्यामुळे लुसी फिशर यांचं मत आश्चर्यचकीत करणारं ठरलं. त्यांच्या या मार्मिक भाष्यामुळे विशिष्ट वर्गाला उत्सुकता निर्माण झाली. कारण, बहुतांशी लोकांनी इरोटीका आणि पाॅर्नोग्राफी साहित्याचा स्वतंत्र विचारच केला नव्हता. त्यामुळे या दोन विषयांमध्ये नेहमीच गफलत होत आली आहे.
चित्रपट, नाटक, संगीत, साहित्य, चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रण, अशा अनेक प्रकारांत आपण इरोटीक कन्टेंट असतो. त्यामध्ये दर्जेदार लिखाणाची अपेक्षा असते. तर, पाॅर्नोग्राफीमध्ये व्यावसायिक दृष्टीकोनच अधिक असतो.
पाॅर्नोग्राफीमध्ये (उदा. संहिता, छायाचित्र आणि चित्रपट) सविस्तर वर्णन करण्याला वाव असतो. यामध्ये साहित्यिक किंवा कलात्मक मूल्य असत नाही. केवळ लैंगिक भावना उत्तेजित करण्यासाठीच्या वर्णनाशिवाय दुसरा उद्देश असत नाही.

२०११ मध्ये अमेरिकन क्लिनिकल सायकोलाॅजिस्ट लिऑन फ. सेल्टझर यांनी इरोटीका आणि पाॅर्नोग्राफीचा फरक करणारा लेख लिहिला होता. त्यात म्हंटलंय की, “इरोटीकामध्ये अतिशोक्तीचा केली जाते. अवास्तव वर्णनही त्यात जास्त असतं. पाॅर्नोग्राफीमध्ये केवळ भावनाच उत्तेजित करणं, त्याचबरोबर मानवी शरीराचे सौंदर्यदेखील अधोरेखित केलं जातं.”

इरोटिकामध्ये एखादा निर्माता कोणत्या दृष्टीकोणातून न्याय देतो, हे फार महत्वाचं ठरतं. पाॅर्नोग्राफीमध्ये सेक्सचा सन्मान करणं हे उद्दिष्ट असत नाही, तर प्रेक्षकांना कामोत्तेजित करणं हा उद्देश असतो. त्यामुळे होतं की, इरोटिकाचा प्रभाव पाॅर्नोग्राफीसारखा पडत नाही. इरोटिकामध्ये सामान्यपणे लैंगिक इच्छेचा विचार केला जातो.
पाॅर्नोग्राफीमध्ये व्यावसायिक दृष्टीकोन असल्यामुळे पैसे कमविणे हा एकमेव उद्देश असतो. तर, इरोटिकामध्ये  प्रत्येक वेळी पैस मिळण्याचा उद्देश असतोच, असं नाही. पाॅर्नोग्रीफी या विषयावर खूप वर्षांपासून आवाज उठवला जात आहे. पोर्नोग्राफीमध्ये स्त्रीयांना लैंगिक वस्तू म्हणून वापर केला जातो. तसेच केवळ मानवाच्या लैंगिक गरजा भागविण्याचे प्रदर्शन करणे, हेच मूळ उद्देश पोर्नोग्राफीचे असते, अशीही टीका केली गेली.
इरोटीक (शृंगारिकता) आणि पाॅर्नोग्राफी (अश्लीलता) या दोन भिन्न कल्पना असल्या तरी इरोटीका म्हणजे अश्लीलता वाटू शकते किंवा अश्लीलता म्हणजेच शृंगारिकता असू शकते. शेवटी समाजाच्या दृष्टीने सेक्सवर चर्चा करणे चांगल नाही आणि पाॅर्न आणि इरोटीका यावर युक्तीवाद करणंही चांगलं नाही. पण, तरीसुद्धा या दोन्ही विषयांवर खुली चर्चा घडली, तर सेक्स, सेक्सविषयीचं लिखाण आणि वाचनात दोन्ही विषयांतला फरक करण्यास मदत होऊ शकते.

Back to top button