आगरताळा, पुढारी ऑनलाईन : त्रिपुरा येथील आगामी निवडणुकीचा सर्व्हे करण्यासाठी गेलेल्या निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या आयपॅक कंपनीचे २२ कर्मचारी आगरताळा येथे गेले आहेत. प्रशांत किशोर यांच्या आयपॅक कंपनीच्या या सर्व कर्मचाऱ्यांना पोलिसांनी नगरकैदेत ठेवले आहे.
अधिक वाचा:
त्रिपुरामध्ये सध्या भाजपची सत्ता असून विप्लब कुमार देब मुख्यमंत्री आहेत.
कोरोना चाचणी केली नसल्याचे कारण देत त्यांना हॉटेलबाहेर पडण्यास मनाई केली असून अहवाल आल्यानंतर त्यांना सोडण्यात येईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
त्रिपुरामध्ये तृणमूल काँग्रेससाठी राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी किशोर यांची टीम गेली होती. आगरताळातील एका हॉटलमध्ये कंपनीचे कर्मचारी उतरले होते.
अधिक वाचा:
गेल्या काही दिवसांपासून हे कर्मचारी येथे आहेत. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांना बाहेर जाण्यास मनाई केली.
आयपॅकचे कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून त्रिपुरामध्ये तृणमूल काँग्रेससाठी राजकीय वातावरण कसे आणि ग्राऊंड रिपोर्ट तयार करण्यासाठी गुप्तपणे फिरत आहेत. हॉटेल वुडलँडमध्ये हे कर्मचारी राहिले आहेत.
पोलिसांना याची गुप्त माहिती दिली. प्रशासनाने याची दखल घेत त्यांना हॉटेलमधून बाहेर पडण्यास बंदी घातली आहे. कोरोना प्रोटोक़ॉलचे कारण देत त्यांना बंदी घातली आहे.
अधिक वाचा:
त्रिपुरामध्ये 2023 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. सध्या या टीमला क्वारंटाइन केले आहे. याबाबत पोलिस अधिकारी म्हणाले, 'सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून रिपोर्टची वाट पाहत आहोत.
त्यांनी कोणताही आरटीपीसीआर रिपोर्ट सादर केलेला नाही.' याबाबत टीएमसीचे त्रिपुरा अध्यक्ष आशिष लाल सिंह म्हणाले, 'हा लोकशाहीवरील हल्ला आहे. आयपॅकची टीम येथे सर्व्हेक्षणासाठी आली होती.
राज्य सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले आहे. कारण ते त्यांच्या सर्व्हेक्षणाच्या निकालांना घाबरत आहेत. त्रिपुराची ही संस्कृती नाही.'
प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगाल येथे ममता बॅनर्जी यांच्यासोबत काम केले होते. भाजपने येथे तृणमूल काँग्रेसला कडवी टक्कर दिली होती. मात्र, ममता बॅनर्जी यांची पुन्हा सत्ता तेथे आली.
सध्या देशपातळीवर भाजपविरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न किशोर यांचा असून त्यात कितपत यश येते हे आगामी काळात दिसून येईल.
हेही वाचले का: