कोल्हापूर : राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी ‘केएसए’च्या चौघांची निवड | पुढारी

कोल्हापूर : राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी ‘केएसए’च्या चौघांची निवड

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्य मानांकित टेबल टेनिस स्पर्धा नुकतीच पुणे -हडपसर येथे झाली. यात कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन ( के.एस.ए.) च्या अनिष सोनटक्के, श्रेयस माने, ऋषीकेश नलवडे व विरेन पाटील यांनी आपापल्या वयोगटात यशस्वी कामगिरी केली. यामुळे चौघांची निवड पाँडेचरी येथे होणाऱ्या राष्ट्रीय मानांकित टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात झाली आहे. विरेन पाटील याने डेहेराडून येथे झालेल्या राष्ट्रीय मानांकित टेबल टेनिस स्पर्धेतील 11 वर्षाखालील गटामध्ये कांस्य पदक मिळाले आहे.

सर्वांना संस्थेचे पेट्रन-इन्‌ चीफ शाहू महाराज, खासदार संभाजीराजे , केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे, मधुरिमाराजे, माणिक मंडलिक, नितीन जाधव, प्रशिक्षक संग्राम चव्हाण, यांचे मार्गदर्शन लाभले. यांना सहाय्यक प्रशिक्षक विवेक गुरव, यांचे मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा

Back to top button