राधानगरी तालुक्यात बुधवारपासून मतपत्रिकेद्वारे मतदानास सुरूवात; वयोवृद्ध-दिव्यांगांना होणार लाभ | पुढारी

राधानगरी तालुक्यात बुधवारपासून मतपत्रिकेद्वारे मतदानास सुरूवात; वयोवृद्ध-दिव्यांगांना होणार लाभ

आशिष पाटील

गुडाळ; पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने प्रथमच दिव्यांग आणि 85 वर्षावरील वयोवृद्ध मतदारांना घरातून मतपत्रिकेद्वारा मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात ईव्हीएम वर सात मे रोजी मतदान होत असले तरी या मतदारसंघ अंतर्गत राधानगरी तालुक्यात दिव्यांग आणि वयोवृद्धांना एक व दोन मे रोजी घरबसल्या मतपत्रिकेद्वारा मतदान करता येणार आहे.

राधानगरी तालुक्यात 31 गावातील 40% पेक्षा अधिक दिव्यांग प्रमाणपत्र असलेले मतदार आणि 85 वर्षावरील वयोवृद्ध मतदारांनी घरबसल्या मतपत्रिकेद्वारा मतदानाची मागणी केली होती. त्याप्रमाणे राधानगरी तालुक्यात मतदान पथके तैनात केली असून ही पथके नेमून दिलेल्या गावात संबंधित मतदारांच्या घरी जाऊन मतपत्रिकेवर मतदान नोंदवून घेणार आहेत. या मतपत्रिका मतपेटीत जमा केल्यानंतर मतपेट्या सीलबंद करून गारगोटी येथे एकत्रित करण्यात येणार आहेत. त्यानंतर सर्व मतपेट्या चार जून च्या निकालापर्यंत कोल्हापुरातील स्ट्रॉंग मध्ये ठेवण्यात येणार आहेत.

राधानगरी तालुक्यात एक व दोन मे रोजी 85 वर्षावरील 203 मतदार आणि 70 दिव्यांग मतदार घरबसल्या मतपत्रिकेवर मतदान करणार आहेत. त्यासाठी 18 पथके तैनात करण्यात आली आहेत.

संबंधित बातम्या

सौ. अनिता देशमुख, तहसीलदार राधानगरी

Back to top button